चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दिवसेंदीवस प्रगतीपथावर – संतोषसिंह रावत

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नफयामध्ये दिवसेंदीवस वाढ होत असून ठेवी व कर्जवाटप तसेच कर्जवसुलीमध्ये वाढ झालेली आहे. तसेच एनपीएचे प्रमाण कमी झाले असून बँक ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे व ग्राहकांया बँकेवरील विश्वास कायम असल्यामुळेय बँक दिवसेदीवस, प्रगतीपथावर असल्याचे बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी सांगीतले.
मागील ५ वर्षात बँकेने ठेववाक, कर्जवसुली, कर्जवाटप, एनपीए कमी करणे, बँकेच्या नफयात चाड, इ. सर्वच क्षेत्रात अविस्मरणीय कामगीरी करून ग्राहकांचा बँकेवर असलेला विश्वास सार्थ ठरविला आहे.
३१ मार्च २०२१ अखेर बँकेच्या ठेवी रु. ३४००.५० कोटी होत्या. बँकेचे एकूण कर्ज रु. १३५७.४२ कोटी असून निव्वळ नफा रु.३.३६ कोटी झालेला होता. या ५ वर्षाचे कार्यकाव्यत यामध्ये लक्षणीय वाघ होउन ३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या ठेवी रु. ४०४७.२७ कोटी, कर्जबाकी रु. १६५३.५६ कोटी असून निव्वळ नफा ३३.८७ कोटी झालेला आहे. मागील ५ वर्षांचे कार्यकाळात बँकेच्या नफयात ३०.५१ कोटीने विकमी वाढ झालेली आहे कर्जवसुलीचे प्रमाण ४२.०४% आहे. ३१ मार्च २०२१ अखेर बँकेचा सकल एनपीए १३.७९% व निवळ एनपीए ३.१७% होता. मागील वर्षात एनपीए मध्ये घट होउन ३१ मार्च २०२५ अखेर बँकेया सकल एनपीए १२.३०% निव्वळ एनपीए ०.८७% आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक ही शेतकरी व सामान्याची बैंक म्हणुन ओळखली जाते. मागील वर्षी ७८२६६ शेतकरी बांधवांना ७३८ कोटीचे पिक कर्जवाटप करून जिलामातील राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षीचे हंगामात ९ मे पर्यंत २६९९५ शेतकरी बांधवांना २९४ कोटीचे पिक कर्जवाटप करण्यांत आलेले आहे.
महीला बचत गटांना कर्जवाटप करण्यास सुध्दा इतर बँकांच्या तुलनेत अग्रेसर आहे. बँकेला संलग्न २७११० बचत गट असून मागील वर्षी ६१७५ बचत गटांना १४३ कोटीचे कर्जवाटप करण्यांत आले व बचत गटाची कर्जवसुली ९०% आहे.
मागील ३ वर्षापासून संलग्न सहकारी संस्थांना लाभांष देण्यांत येत आहे. सप २०२२ मध्ये ४% व सन २०२३ मध्ये ५% सन २०२४ मध्ये ६१% लाभांष देण्यात आलेला आहे. व या वर्षी सुध्दा ७१% पर्यंत लाभांष देण्यांचा बँकेचा मानस आहे. असे बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी सांगीतले
उपरोक्त सर्व बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारणेचे श्रेय बँकेचे ग्राहक, वैविदार व संस्था सभासदाना जाते असेही ते आर्वजून म्हणाले.