ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये “डिजिटल साक्षरता” या वर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या पाचव्या दिवशी “डिजिटल साक्षरता” या विषयावर बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शशिकांत सीत्रे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉक्टर कार्तिक शिंदे , सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. लेफ्टनंट सचिन श्रीरामे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कुलदीप भोंगळे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये साक्षरता म्हणजे काय. या डिजिटल युगामध्ये आपण कशाप्रकारे डिजिटल साक्षर होत आहोत त्याचे काय फायदे आहेत व त्याचे काय नुकसान आहेत त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेचा वापर करून शिक्षणामध्ये कशाप्रकारे बदल झालेला आहे यावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले.

तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शशिकांत सीत्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डिजिटल साक्षरतेमुळे आपण देश व विदेशातील माहिती कशी मिळू शकतो यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता पाल तर आभार प्रदर्शन कांचन गजबे हिने केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे, प्राध्यापक डॉक्टर किरण जुमडे, प्राध्यापक संदीप प्रधान व श्री शरद भावरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शिबिरातील विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये