ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बचत गटाचे माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक व राजकीय सक्षमीकरण होत आहे _ कुमारी शायना पठाण 

बी जे एस व नपच्या संयुक्त विद्यमाने मातृत्व दिनाचे निमित्ताने महिला सक्षमीकरणावर व्याख्यानाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 जागतिक मातृत्व दिनाचे निमित्ताने शहरात नगरपरिषद प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी महिला सक्षमीकरणावर व्याख्यानाचे आयोजन दिनांक 11 मे रोजी करण्यात आले. यावेळी उपस्थित बचत गटाच्या व इतर महिलांना मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त प्राचार्य कुमारी शायना पठाण यांनी सांगितले की राज्यात शासनाचे वतीने बचत गटाचे माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येत असून याच व्यासपीठामुळे महिलांचे सामाजिक व राजकीय सक्षमीकरण मोठ्या झपाट्याने होताना दिसत आहे प्रत्येक क्षेत्रात महिला या अग्रस्थानी असून आता तर युद्धात सुद्धा महिलांनी सहभाग नोंदवल्याचे त्यांनी सांगितले याबाबत सविस्तर असे की जागतिक मातृत्व दिनाचे निमित्ताने भारतीय जैन संघटना व नगरपरिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन 11 मे रोजी नगरपरिषद च्या सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलढाण्याच्या सेवानिवृत्त प्राचार्य कुमारी शायना पठाण तर प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जैन संघटनेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर अनुजा डोणगावकर व सौ वैजयंती रवींद्र खडकपूरकर उपस्थित होते उपस्थित बचत गटाच्या व इतर महिलांना मार्गदर्शन करताना शायना पठाण यांनी सांगितले की मातृत्व दिन म्हणजे प्रत्येक आईसाठी हा महत्त्वाचा दिन असतो आई आपल्या बाळाला पोटात असताना ज्या प्रकारे जप्ते त्याचप्रमाणे त्या बाळाने भविष्यात चांगले नाव कमविण्यासाठी आईने गरोदरपणातच चांगले विचार मनात ठेवून चांगली चांगली पुस्तके वाचली पाहिजे व बाळाच्या जन्मानंतर त्यावर चांगले संस्कार करून त्याला उच्चशिक्षित करून स्वयंभू बनवण्याचे काम करावे आईने स्वतःला सक्षम बनवण्यासाठी स्वतःच पुढाकार घ्यावा बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचे संगोपन करून प्रत्येक ठिकाणी आईचा सन्मान व्हावा असे सांगून श्री आणि पुरुष हा भेदभाव आदिमानव काळात नव्हता याचे बीज फार कालांतराने पेरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले श्री भृण हत्या झालीच नाही पाहिजे एक श्री जन्माला येणाऱ्या दुसऱ्या श्री हे सुंदर जग पाहण्या पासून कसे रोखू शकते असा सवाल त्यांनी करून श्री भ्रूणहत्याला प्राधान्य देण्यात येऊ नये असे त्यांनी सांगितले.

आई जर सुजाण असली तर बाळाचे संगोपन चांगल्या प्रकारे होऊ शकते पतीला व्यसना पासून दूर करण्याची जबाबदारी पत्नीची असते यासाठी ज्याचे कुटुंबात ज्या पत्नीचा पती व्यसनाधी असेल त्या परिवाराने त्या पत्नीने त्या पतीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय संघटनेचे सन्मती जैन, शाखाध्यक्ष पियुष खडकपूरकर, राजकुमार कछोट तर नगरपरिषदचे वतीने राजेंद्र वानखेडे व सौ माधुरी जाधव यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र वानखेडे यांनी तर आभार सन्मती जैन यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये