विवेकानंद विद्यालयास आ. अभिजित वंजारी यांचे निधीतून संगणक प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील विवेकानंद विद्यालयास नागपूर पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांचे आमदार निधीतून संगणक संच प्रदान करण्यात आले.
शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी ग्रंथालयांना नव्या युगाची पुस्तके तथा विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर घालण्यासाठी संगणक संच वाटपाच्या हेतूने चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांच्या आमदार निधीतून विविध शैक्षणिक संस्थांना ग्रंथालयीन पुस्तके व संगणक संच वाटप करण्यात आले. या अंतर्गत विवेकानंद ज्ञानपिठ (कॉन्व्हेेंट), वरोरा द्वारा संचालित भद्रावती येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयास प्राप्त संगणक संच मुख्याध्यापिका सौ कल्पना वि. बांदुरकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री विजय झेड. लांबट आणि कनिष्ठ लिपिक श्री विनोद आर. गावंडे यांनी स्वीकारला.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी आमदार अभिजित वंजारी यांचे सोबतच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजूकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश पातळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.