क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देऊळगाव राजा येथे २०० विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप
मावळा क्रिकेट प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देऊळगाव राजा येथे मावळा क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. देऊळगाव राजा हायस्कूल येथे आयोजित या कार्यक्रमात आठवी व नववीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या चरित्रावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले पीएसआय भोसले यांचे मार्गदर्शनपर भाषण. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीसाठीचे योगदान, सामाजिक समतेसाठी त्यांनी केलेले कार्य, तसेच महात्मा फुले यांनी शिक्षण आणि स्त्री-शिक्षणासाठी केलेली चळवळ यांचा सखोल ऊहापोह केला. विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरणादायी उदाहरणे देत सांगितले की, “ही महापुरुष आपल्याला केवळ इतिहासातच नाही, तर जीवनातही दिशा दाखवतात.”
कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य कोल्हे प्राध्यापक मुडे , पत्रकार राजेश पंडित, गवई साहेब, राजेश कांबळे, राम विजय नरोडे,जाधव सर,संदीप मापारी , विशाल जगताप योगेश खराट, खंडू, पाटील, विठ्ठल, वाघ नंदू झोरे, प्रतीक, शेखर, आकाश शिंगणे तसेच मावळा क्रिकेट प्रतिष्ठानचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करून त्यांना वाचनाची गोडी लावण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमानंतर प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले की, “आमचा उद्देश फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही, तर समाजोपयोगी उपक्रम राबवून नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याचा आहे. भविष्यात असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.”हा उपक्रम केवळ पुस्तकवाटपापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला.