शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी देऊळगाव राजा येथे केले स्थानबद्ध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
१९ मार्च रोजी मुंबई येथे होणा-या कर्जमुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतभाऊ तुपकर यांचे खंदे समर्थक शेख जुल्फेकार शेट, गणेश शिंगणे, यांच्या सह देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना निवासस्थानावरुन सकाळी व काहींना रात्रीच पोलीसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ठेवले आहे..
राज्य सरकार शेतकऱ्याच्या आंदोलनाची धास्ती घेतली असून जवळपास मुंबईला जाणा-या इतरही लोकांना ताब्यात घेतले असून सरकार आंदोलनकर्त्यांना घाबरले असून आंदोलनाची ही ताकद असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शेतकरी नेते रविकांतभाऊ तुपकर साहेबांनी सरकार हलवलं आहे. एवढं मात्र खरं.
सरकार सत्तेचा व पोलिसांचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं..