ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका स्तरीय पिक्चर कलरिंग कॉम्पिटिशनचा बक्षीस वितरण सोहळा दिमाखात पार पडला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- शालेय विद्यार्थ्यांमध्ये कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान, सभा-धिटपणा, नेतृत्वक्षमता, सामाजिक भान इ. गुण वाढीस लावण्यासाठी प्रयत्नशील असणारी तसेच थोर महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी कटिबद्ध असणारी एक सेवाभावी संस्था सत्यशोधक फाउंडेशन ब्रह्मपुरी तसेच शाश्वत क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुका लेवल पिक्चर कलरिंग कॉम्पिटिशन या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अखेर 09 मार्च रोज रविवारला ब्रह्मपुरी येथील राजस्थानी भवन या ठिकाणी पार पडला.

याप्रसंगी बक्षीस वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून डॉ. एन. एस. कोकोडे, उद्घाटक म्हणून एडवोकेट आशिष गोंडाने, प्रमुख पाहुणे सोमेश्वर एलचलवार, दीपक देवतळे गटशिक्षणाधिकारी आरमोरी, मयूर लाडे गटशिक्षणाधिकारी ब्रह्मपुरी, प्रभाकर बार्शिंगे विस्तार अधिकारी आरमोरी हे उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये अ आणि ब अशा दोन्ही गटातून ब्रह्मपुरी, आरमोरी व नागभीड या तालुक्यातील बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

 ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये अ गटात देवांश महेश येळणे प्रथम, श्रावणी प्रमोद मोहनकर द्वितीय, तर तनुश्री उमेश करंडे तृतीय, तसेच ब गटात सोहम सचिन ठेंगरी प्रथम, पूर्वा प्रवीण दशसहस्त्र द्वितीय, निधी नितीन येरपुडे तृतीय.

आरमोरी तालुक्यामध्ये अ गटात शर्विल संजय सुपारे प्रथम, ऋतिका अजय डोकरे द्वितीय, रिद्धी भोजराज सोनकुसरे तृतीय, तर ब गटात फाल्गुनी अशोक दुमाने प्रथम, तनवी सुनील गुरनुले द्वितीय, वैदेही मोहन खरवडे तृतीय.

 नागभीड तालुक्यात अ गटात वेदांत विजय वसाके प्रथम, डिंपल युवराज पर्वतकार द्वितीय, लक्ष सुधाकर ठाकरे तृतीय तर ब गटात ज्ञानेश्वरी धनंजय चौधरी प्रथम, श्रद्धा प्रकाश पाथोडे द्वितीय, भार्गवी समीर नागरे तृतीय हे विद्यार्थी विजयी ठरले.विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी सायकल, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी काही सत्कारमूर्तींच्या सत्कार करण्यात आला. यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण डिसेंबर राजीराम दिवटे,आयबीपीएस परीक्षा उत्तीर्ण हितेश डाकराम नाकाडे तसेच आयबीपीएस परीक्षा उत्तीर्ण रुपेश माणिक ढोरे या सत्कारमूर्तींचा सत्यशोधक फाउंडेशन च्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी आशु बनकर, टेकचंद सोनुले, प्रवीणा चाटोरे, स्वप्निल बानाईत, प्रेमदास पारधी, सोपान तडोसे, कीर्तीवान नागोसे, विजय जेंगठे, विक्रम मानकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा प्रकाश पंडित हिने, प्रास्ताविक सत्यशोधक फाउंडेशनचे अध्यक्ष कुशांतकुमार चाटोरे यांनी, तर आभार प्रदर्शन हिमांशू कोटरंगे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये