ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होळी सनानिमीत्य गावठी मोहा दारू नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 7.03.2025 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी यांनी गोपनिय माहीती काढून पोलीस स्टेशन सेलू हददीत होळी निमीत्य आरोपी नामे राजु उर्फ स्टेपनी राउत रा. सुकळी (स्टेशन) ता.सेलू जि. वर्धा हा मौजा सुकळी (स्टेशन) येथे नाल्याचे काठावर गावठी मोहा दारू तयार करणे करीता कच्चा मोहा रसायन सजवा तयार करीत आहे या बाबत माहीती मिळात आरोपी याचेवर प्रोव्हीशन रेड केला असता त्यास पोलीस आल्याची चाहुल लागताच पसार झाला मौक्यावरून 1) 20 नग छोटया प्लॉस्टीक ड्रम मध्ये कच्चा मोहा रसायण सडवा प्रति ड्रममध्ये 100 लिटर प्रमाणे एकुण 2000 लिटर प्रति ली. 200 रू प्रमाणे एकुण 4,00,000/- रु. 2) 20 नग सडवा ड्रम प्रति नग 500 रू प्रमाणे एकुण 10.000/- रू 3) 5 नग लोखंडी भटटी ड्रम प्रति नग 1000 रू प्रमाणे एकुण 5,000/- रु 4) 4 नग लोखंडी पाण्याचे पिपे प्रति नग 200 रू प्रमाणे एकुण 800 रू असा जु, कि 4,15,800/- रू चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करून जागीच नाश करण्यात आला.

पोलीस स्टेशन सेलू येथे आरोपी यांचे विरुध्दात अपराध क्रमांक 253/2025 कलम 65 फ. म.दा.का. अन्वये नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. सेलू येथील पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्रीअनुराग जैन सा. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये