ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आजपासून वरोऱ्यात खासदार चषक अ.भा. व्हॉलीबॉल स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा :- वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन व लोक शिक्षण संस्था वरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर स्मृती प्रीत्यर्थ आजपासून स्थानिक लोकमान्य महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवसीय अखिल भारतीय खासदार चषक पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे सामने रंगणार आहेत.

     सूर्य प्रकाश व विद्युत प्रकाश झोतात खेळविण्यात येणाऱ्या स्पर्धेत बंगाल, ओरिसा, तेलंगाना, तामिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र इत्यादी राज्यांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेले नामांकित महिला व पुरुष संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी (आज ) सायंकाळी ५.३० वाजता तर सांगता २० फेब्रुवारी रोजी लोकमान्य विद्यालयाच्या मैदानावर बक्षीस वितरण समारंभाने होणार आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि बक्षिसांचा वर्षाव

     खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धेमध्ये पुरुष गटातील विजेत्या संघाला प्रथम पुरस्कार 1लाख रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार 75 हजार रुपये रोख व चषक, तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये रोख व चषक, चतुर्थ पुरस्कार 25 हजार रुपये रोख व चषक तसेच महिला गटात प्रथम पुरस्कार 75 हजार रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार 50 हजार रुपये रोख व चषक, तृतीय पुरस्कार 25 हजार रुपये व चषक, चतुर्थ पुरस्कार 15 हजार रुपये व चषक तसेच इतर वैयक्तिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी येथील लोकशिक्षण संस्थचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे अध्यक्ष मानस धानोरकर व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांच्या नेतृत्वात आयोजन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खेळाडू अथक परिश्रम घेत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये