ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किनगाव राजा येथे 2 फेब्रुवारी रोजी रात्रिकालीन कबड्डी सामने 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दुर्गा मंडळ, द्वारा 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता रात्रकालिन खुले कबड्डी सामने किनगाव राजा येथे स्वामी कबड्डी संघ क्रिडा प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे, प्रथम बक्षिस 21000 रूपये रोख व ट्रॉफी, द्वितीय रूपये 11000 रुपये, तृतीय बक्षिस 7000 रूपये, चतुर्थ बक्षिस 5000 रूपये देण्यात येईल.

कबड्डी सामन्याचे उद्घाटन भाजप नेते विनोद वाघ, ठाणेदार विनोद नरोडे, माजी सरपंच छगन खंदारे, ज्ञानेश्र्वर कायंदे, व इतरांच्या हस्ते होईल, कबड्डी स्पर्धेत जास्तीत जास्त चमूने सहभाग घ्यावा असे आवाहन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दुर्गा मंडळ, किनगाव राजा च्या वतीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये