ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे लैंगिक समानता व राष्ट्रीय रॅगिंग प्रतिबंध कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात ०८ ऑक्टोबर रोजी लैंगिक समानतेवर आणि राष्ट्रीय रॅगिंग प्रतिबंध कार्यक्रम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या आंतरिक तक्रार समिती आनी अँटी-रॅगिंग सेल द्वारे करण्यात आले होते. महिलांना शैक्षणिक व कामाच्या ठिकाणी असुरक्षितेलाला सामोरे जावे लागत असल्यामुळे, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने rights of women at educational and workplace (Prevention, Prohibition, Redressal) act 2013, कायदा पारित केला. या कायद्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, व विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार या कायद्याअंतर्गत येतात व त्यावर आळा कसा घालावा याविषयी माहिती पुरविणे तसेच महाविद्यालय मधे कुटल्याही प्रकरची रॅगिंग ची घटना घडू नये या करिता जनजागृती कर्णे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.

या कार्यशाळेसाठी मुख्य मार्गदर्शिका म्हणून अँड. दीपांजली मंथनवार लिगल अँडवायजर कोरपणा कोर्ट उपस्थित होत्या. मुख्य अतिथी म्हणून सौ.जुबेदा शेख व कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून मा. सौ. वीणा देशमुख पीठासीन अधिकारी अंतर्गत तक्रार समिती, यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव हे हजर होते, सोबतच कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. चेतन वैद्य समन्वयक ICC Aani अँटी रॅगिंग समिती यांनी केली. कार्यशाळेचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. मनोहर बांद्रे ग्रंथपाल यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये