Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवरात्री निमित्त शहरातील नऊ मुख्य समस्या घेऊन साखळी उपोषण

चांदा ब्लास्ट

 घुग्घुस (चंद्रपुर) : शहरात विविध समस्या असून आजपर्यंत कोणत्याच राजकर्त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आणि गावातील काही मुख्य मागण्या घेवून प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने चंद्रपुर तालुका प्रमुख अमोल मांढरे व यांचे मित्र परिवार आदिशक्ती आई दुर्गा भवानी चे नऊ दिवसाचे व्रत करून नवरात्री निमित्त गावातील नऊ मुख्य समस्या घेऊन साखळी उपोषण सुरू केला.

 शहरातील अनेक समस्या असुन त्यातील नऊ मुख्य मागण्या असा आहे की गावातील मुख्य रस्तावर बनत असलेल्या ओवर ब्रिज येथील ट्राफिक ची समस्या तत्काळ संपवण्यात यावी जेनेकरून या परिसरातुन ये जा करणा – या पदचारी, शाळेकरी मुलांना, स्कुल बस व अंबुलन्स सारख्या अत्यंत आवश्यक वाहनांना कुठलीही समस्या होणार नाही या आधी एस.पी.नी ट्रक सारख्या मोठया वाहनांचे आवागमन बंद करण्याचे पत्र काडुन सुध्दा स्थानिक पोलिस प्रशासनाचे या विषयाकडे दुर्लक्ष असून श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुध्दा याच पध्दतीचा नाहक त्रास सर्वसाधारण जनतेला होत असून पोलिस प्रशासनांना सद रक्षनाय खलनिग्रहनाय या ‘ब्रिद वाक्यानुसार आपले कर्तव्य पार पाडावे व येथील लोहा पुलिया चालु करणे, शहरातील लॉयडस् मेटल हद्दीत येत असलेल्या मुख्य चौकात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवुन परिसर उभारणे, शहरातील मुख्य रस्त्यावर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका, दुर्गा माता मंदीर… आणि तलाव जवड असलेले बार तसेच देशी दारू चे दुकान शहरा बाहेर 2 कि.मी.अतंरावर स्थलांतरित करणे, शहरातील पुरातन गांधीचौक येथे सत्य व अहिंसेचे राष्ट्रपिता महात्मागांधी यांचे स्मारक बनविणे, महसुल विभागा अंतर्गत येत असलेल्या जागेवर वे.को.ली द्वारे बनविण्यात आलेल्या इमारतींला दिव्यांग भवन असे नाव देउन शहरातील गौर गरीब जनते करीता उपलब्ध करून देणे, ए.सी.सी.कंपनीचा अंतर्गत येत असलेल्या फटाका मैदानावरती तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या नावाने शहरातील सांस्कृतीक कार्यक्रमा करीता स्टेज (चबुतरा) बनविणे, वे.कोली. कंपनीचा अंतर्गत येत असलेले मोठे तलाव व दिक्षीत यांचे खाजगी तलाव स्वच्छ करून सौदर्यीकरण करणे, शहरातील मुख्य रस्ता असलेले पोलिस स्टेशन पासून ते हिंदु बौध्द स्मशान भुमी पर्यंत दोन्ही बाजुला वृक्षारोपन करून परिसर स्वच्छ करणे, ए.सी.सी.कंपनीचा अंतर्गत येत असलेल्या खुल्या जागेवर रामायनाचे रचयते आद्य कवी महर्षी वाल्मिकी महाराज यांचा पुतळा बनवून परिसर स्वच्छ करून व या चौकाला महर्षी वाल्मीकी चौक नाव देण्यात यावे, या शहराच्या मुख्य मागण्या असून प्रशासनाचे लक्क्ष वेधण्याकरीता भक्ती मार्गाने या सर्व मांगण्या अनोका आंदोलन सुरू झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये