ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मांगली येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
शेतातील गोठ्यात घेतला गळफास
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे
तालुक्यातील मांगली येथील एका युवकाने गावालगत असलेल्या आपल्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मांगली येथे दिनांक ७ रोज शनिवारला घडली. ऋतिक विजू चौधरी, वय २२ वर्षे, राहणार मांगली. असे मृतक युवकाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी येऊन आवश्यक ती कार्यवाही केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही.



