Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्षा सोमलकर राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     चंद्रपूर येथील वर्षा सोमलकर यांना नक्षत्र समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पिंपरी चिंचवड सायन्स पार्क सभागृहात आयोजित नक्षत्रांच देणं काव्यमंच च्या वतीने सदर सन्मान ज्येष्ठ साहित्यिक कवी नारायण सुमंत (सोलापूर), श्रीकांत चौगुले, वादळकार कवी प्रा. राजेंद्र सोनवणे , प्रसिद्ध उद्योजक शिवहर मरे यांच्या उपस्थितीत सोमलकर यांना प्रदान करण्यात आला.

     नक्षत्राचं देणं काव्य मंचाच्या वतीने राज्यभरातील सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून प्रवेशिका बोलाविल्या होत्या. आलेल्या प्रवेशिकेतून वर्षा सोमलकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वर्षा सोमलकर ह्या गेल्या २० वर्षांपासून सातत्याने सामाजिक सेवा कार्य, महिला संघटन, महिला सक्षमीकरण, काव्य लेखन क्षेत्रात कार्य करीत आहेत.

  पुरस्काराबद्दल वर्षा सोमवलकर यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये