Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी घेतली गणेशपूर – चिचखेडा येथे करंट लागून मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट

कुटुंबीयांना सांत्वना देत दिला आर्थिक मदतीचा आधार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

एकाच गावातील ४ लोकांच्या मृत्यूने परिसरात शोककळा 

११ ऑगस्ट रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्याला हादरा बसला आहे. एकाच गावातील ४ लोकांचा शेत शिवारात करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गणेशपूर येथे घडली. पुंडलिक मानकर (चिचखेडा), प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत (सर्व गणेशपूर) हे सकाळी शेतात खत मारायला गेले होते. त्या नंतर धान पीकाला जंगली जनावरांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता झटका मशीन चा तार लांबविण्याचे काम करत असतांना विद्युत प्रवासोबत संपर्क झाल्याने चार ही व्यक्तींचा करंट लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा परसली. या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते व माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी मृतकांना ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनकरीता आणले असता रुग्ण्यालयात भेट दिली व स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांना सूचना करत शवविच्छेदन तात्काळ करवून घेतले.

आज सकाळी (दि. १२/०९/२४) ब्रम्हपुरी विधानसभेचे नेते माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी गणेशपूर व चिचखेडा येथे जाऊन मृत पावलेल्या चार ही व्यक्तींच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी माजी आमदार देशकर यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदत करत आधार दिला. या वेळी या घटनेत जखमी झालेल्या वक्तीची सुद्धा भेट घेत त्याला उपचाराकरिता आवशक ती मदत माजी आमदार प्रा. देशकर यांनी केली. या दरम्यान प्रा. अतुल देशकर यांनी गावकऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये