Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंदनखेडा आदर्श गावात पार पडला प्रेमात गुरफटलेला प्रेमियुगलाचा प्रेमविवाह

चंदनखेडा तंटामुक्ती समितीच्या पुढाकाराने 2024 या वर्षात 10 प्रेमविवाह संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ

       भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने धोंडगाव तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील असुन ते पाचगाव येथे येऊन काही दिवस राहिले. तेथील पोलीस, नातेवाईक व स्वप्निल कैलास कोल्हे (२२) व संजीवनी विनोद अंबाडरे (20) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे येवून विवाह लावून देण्यात यावा अशी मागणी केली. व अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती. त्यांच्या या अर्जाचा त. मु. समितीने ग्रामपंचायत मध्ये समीतीची सभा बोलावुन दिनांक 08 सप्टेंबर 2024 ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून, या विवाहाला समितीचे उपस्थित सर्व सदस्य मंडळी होकार देवून या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई – भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आले.

व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावे अशा शुभेच्छा मुलाच्या आई – वडिल, भाऊ व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कडुन देण्यात आल्या. त्यांचा विवाह 10 सप्टेंबर 2024 मंगळवारला सायंकाळी 7:15 वा विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान चंदनखेडा येथे गावातील पंचासमक्ष लावून दिला.

यावेळी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल हनवते,पाचगाव चे पोलिस पाटील.विकास दुरनकर,खोकरीचे पोलिस पाटील सतीश कुरेकर,सिंगलदीप पेंदाम, रविंद्र मेश्राम,शाहरुख पठाण, विठ्ठल महागमकार, अशोक रणदिवे, नंदकिशोर जांभुळे,सुधाकर दोडके,संदिप चौधरी, सतिश कुरेकार, सतिश उरकांडे, निसार का पठाण,अतुल घरत, गणेश जिवतोडे,संबा दडमल,बशीर शेख,तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, सुशिलाबाई हनवते, अमृता कोकुडे,,सोनाबाई खडसंग,गंगु शेरकुरे,नसरिन पठाण,छाया मांदाळे, वैशाली दडमल, सुनंदा नन्नावरे, बेबी गुरुनुले, आशा दुटनकर,गुलाब नन्नावरे,सिमा दुटनकर, स्वप्निल गायकवाड, दिलिप कुळसंगे,विजय दुटनकर,कमल बाटबरवे, कवडु जांभुळे, बालाजी धोंगडे, उद्धव नन्नावरे, रमाकांत बोढे, आशा नन्नावरे,शारदा गोहणे, आनंद राजनहिरे, ईश्वर लाखे,गोरख कोकुडे,कवडु पाठक,शरद कोकुडे,अक्षय शेंन्डे, विठ्ठल चौधरी, भाग्यश्री सोनुले, सुषमा सोनुले,पुरषोत्तम पाठक, अरविंद पाटिल, महेंद्र गुरुनुले, प्रफुल्ल ठावरी,देवानंद पांढरे, वृषभ दडमल,देवानंद दोडके,अमोल महागकार, प्रमोद हनवते, स्वप्निल चौखे, शंकर दडमल,,अनिल हनवते, आनंदराव दडमल, रमेश चौखे,पवन भोस्कर,दिलिप ठावरी,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये