Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानीत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राज्याच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक कार्याची दखल घेतली असून, महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले विद्यालयातील मुख्याध्यापक धर्मराज रामकृष्ण काळे यांची निवड करण्यात आली 2024 साठी माध्यमिक विभागातील हा पुरस्कार 5 सप्टेंबर 2024 रोजी भव्य राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रमात प्रदान केला.

सावित्रीबाई फुले विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथील मुख्याध्यापक श्री धर्मराज रामकृष्ण काळे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य शिक्षण विभागाने त्यांना पुरस्कारासाठी निवडले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ही पहिलीच निवड आहे, ज्यामुळे सर्व शिक्षक व सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

2024 च्या राज्य पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे शिक्षण विभागातील माध्यमिक शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनवणे मॅडम, प्राचार्य हिवाळे साहेब (डायट), गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपना सचिन मालवी , केंद्रप्रमुख पंढरी मुसळे यांच्यासह सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर आ.श.अडबाले, उपाध्यक्ष तु.ता.पुंजेकर, सचिव ना.श.बोबडे, माजी सचिव व सभापती नो.शा.मंगरुळकर यांची अभिनंदनाची पत्रे प्राप्त झाली आहेत. यासोबतच आजी-माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर व कार्यरत कर्मचारी वृंद आणि स्टेट बँक शाखा लखमापूर शाखेचे कर्मचारी अनिल देवलवार यांनीही कौतुकाची भरघोस दखल घेतली आहे.

राज्य सरकारने 2023-24 चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार 2 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केला आणि 5 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईत एकूण 110 शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील पाच शिक्षकांचा समावेश आहे: 39 प्राथमिक शिक्षक, 32 माध्यमिक शिक्षक, 19 आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक, 8 आदर्श शिक्षिका, 2 विशेष शिक्षक (कला व क्रीडा), 1 दिव्यांग शिक्षक वा दिव्यांग शाळेतील शिक्षक आणि 2 स्काऊट गाईड शिक्षक. राज्य निवड समितीने ही निवड केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर चे मुख्याध्यापक धर्मराज रामकृष्ण काळे यांच्यासोबतच प्राथमिक शिक्षक गटातून सावली तालुक्यातील मोखाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या सहाय्यक शिक्षिका मालती भास्कर सेमले, आदिवासी क्षेत्रातील टेकामांडवा येथील गोतावळे, दिव्यांग शिक्षक गटातून गोडपिपरी तालुक्यातील खराळपेठ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक संतोष मंगरू मेश्राम आणि श्रीमती सुलक्षणा प्रमोद गायकवाड यांची निवड आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी करण्यात येऊन सन्मानीत करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये