Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुतळ्याचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न आरएसएस विचारसरणीच्या भाजप नेत्यांनी केला आहे.

रिपाइं (ए) तर्फे राज्य सरकार व रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध! : महेंद्र मुनेश्वर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे.२८ ऑगस्ट रोजी मालवण बंदच्या आंदोलनात महाविकास आघाडी आणि भाजपाचे भारत सरकारचे मंत्री नारायण राणे यांनी मारुन टाकण्याची धमकी दिल्यानंतर जे काही खटके उडाले हे कृत्य, फुले शाहू आंबेडकर यांच्या राज्यातील विचाराचा अवमान करणारे असुन नारायण राणे व त्यांचे पुत्र यांची दादागिरी पुरोगामी विचारला कलंकित करणारी आहे.असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर वर्धा येथे घेण्यात आलेल्या पक्षाचे निषेध बैठकीत म्हणाले.ते पुढे म्हणाले की,मालवणमध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजप,आरएसएस विचारसरणीच्या राज्य सरकारने केला आहे,त्यामुळे आम्ही रिपब्लिकन कार्यकर्ते राज्यातील शिंदे,फडणविस सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत.

आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) विदर्भ प्रदेश ने,सेवाग्राम रोड,म्हाडा कॉलनी वर्धा येथे मालवण येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अवमान घटने संदर्भात राज्य सरकारच्या निषेधार्थ बैठक घेत महायुती भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना भाजपा राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केले नाही,मात्र मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकामात तसेच या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केला गेला असा आरोप रिपाइं (ए) ने केला आहे.राज्यातील वाढत्या असंतोशाची किंमत महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला नक्कीच मोजावी लागेल असा सनसनाटी आरोपही रिपाइं (ए) च्या विदर्भ नेत्यांनी या निषेध बैठकी प्रसंगी केला आहे.

इतिहासात ज्यांनी नौसेना स्थापन केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत राज्य सरकारने एवढी हलगर्जी का केली ? याचे उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला द्यावे.छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही,असेही बैठकीत राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदविताना मुनेश्वर म्हणाले.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण आणि मालवण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात दोन्ही ठिकाणी आपटे नावाच्याच व्यक्ती जबाबदार आहेत.हे दोघेही भाजप आरएसएस चे भक्त आहेत.या आपटेंना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या आरोपातून मुक्त करण्यासाठी पाखंडी सोंग करत आहे.जर फडणवीस आपटेंना वाचवत असतील तर राज्यात महायुतीच्या सरकारला कसे आडवे झोपायचे,हे आंबेडकरी व पुरोगामी सामाजिक संघटना कार्यकर्त्यांना चांगले माहीत आहे असे विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र नितनवरे म्हणाले.

“जयदीप आपटे हा सनातन प्रभातशी कसा संबंधित आहे,हे त्याच्या मुलाखतीवरून स्पष्ट झाले आहे.ज्याला मोठे पुतळे बनवता येत नाही,अशा व्यक्तीला एवढा मोथा पुतळा बनवण्याचे काम राज्यातील फडणविस सरकारने कसे दिले ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश सचिव कैलास मोरे यांनी केला.राज्यातील सरकारच्या भाजप फडणविस कृतीवर भाष्य करताना विदर्भ रिपाइं नेते भिमराव डोंगरे,संतोष इंगळे आदींनी रिपाइं (आंबेडकर) विदर्भ स्तरीय बैठकीतून मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या भावना रामगिरी महाराज यांनी दुखावल्यामुळे संताप व्यक्त केला.व रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध रिपाइं (ए) तर्फे केला.

मालवणमध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजप आणि आरएसएस विचारसरणीच्या नेत्यांनी केला आहे.असा आरोप सुध्दा रिपाइं (आंबेडकर) चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी २९ रोजी वर्धा येथे घेण्यात आलेल्या बैठकीत केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये