Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून प्राण्यांना निर्दयतनेने वाहतुक करणाऱ्यांवर धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 25/08/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे दवाखाना चौक हिंगणघाट येथे कंटेनर क. KA-01/AN- 5028 यावर सापळा रचुन कार्यवाही केली असता, यातील आरोपीतांनी कंटेनरमध्ये म्हैस जातीचे 54 नर बछडे व 01 मादी बछडा असे एकुण 55 जनावरांना कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन हालचाल करण्यास पुरेशी जागा नसतांना कुरतेने आखुड दोरीच्या साहायाने बांधुन नमुद जनावरांना कोणत्याही प्रकारची हवा व प्रकाश येणार नाही.

अशा बंदिस्तरित्या झाकुण त्यांना कोणतीही चारा पाण्याची सोय न करता आतील उष्णतेमुळे व्याकुळ झालेले वेदनादायक स्थितीत निर्दयतेने व कुरपणे बांधलेले व कोणतेही वाहतुकीचा परवाना नसतांना घेवुन जात असतांना मिळुण आल्याने, आरोपी 1) मोहम्मद बिलाल अयुब, वय 28 वर्ष, रा. रिठ्ठ तह. फरोजपुर, जि. नुहु राज्य हरियाणा, 2) शाहीद खुर्शिद खान, वय 26 वर्ष, रा. तिरूवाडा, तह. पुन्हाना, जि. नुहु राज्य हरियाणा, 3) आमिर इस्लाम खान, वय 25 वर्ष, रा. खेत्रीपुरा बागपत, राज्य उ.प्र., 4) सुफीयान जान मोहम्मद कुरेशी, वय 23 वर्ष, रा. पुराना कसबा बागपत राज्य उ.प्र. 5) शाबीर यासिन खान, वय 22 वर्ष, रा. खेत्रीपुरा बागपत, राज्य उ.प्र., यांचे ताब्यातुन 55 म्हशीचे बछडे कि. 5,50,000 रू. व एक कंटेनर क. KA-01/AN-5028 कि. 25,00,000 रू असा जु.किं. 30,50,550 रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे कलम 11 (1) (घ), (ङ), (च). (ज). (झ) प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम 1960 सहकलम 124 म.पो.का., 3 (1) 181,130/177 मो.वाका. अन्वये गुन्हानोंद करण्यात आला असुन,

प्राण्यांना गौरक्षण संस्था मुंदडा कॉलनी हिंगणघाट यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा, अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, अमोल लगड, सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, संजय बोगा, शेखर डोंगरे, राजेंद्र तिवसकर, संघसेन कांबळे, अभिषेक नाईक, मिथुन जिचकार, विनोद कापसे, मुकेश ढोके, सर्व नेमणुक स्था.गु.शा. वर्धा व गोविंद मुंडे (सायबर सेल वर्धा) यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये