ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून मोटर सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकिस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 29/08/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथकाने, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे आरोपी हरिकृष्ण उमाकांत बारई रा. परडा तह. समुद्रपुर यास रेल्वे स्टेशन वर्धा येथुन रितसर ताब्यात घेत विचारपुस केली असता, सदर आरोपीने त्याचा मित्र शुभम रामटेके रा. चंद्रपुर ह.मु. भारकस बु‌ट्टीबोरी याचे मदतीने सोनेगाव धोटे व संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा परीसरातून दोन मोटर सायकल चोरी केल्या असून, त्या दोन्ही मो.सा. पत्नीचे आजाराचे खोटे कारण सांगुन मित्राकडे गहाण ठेवल्याचे सांगितले असुन, आरोपी हरिकृष्ण बारई याचे ताब्यातुन मो.सा. क MH-32/AP-3813 व MH-34/BN-2468 अशा दोन मोटर सायकल जप्त करण्यात आल्या असुन, पो. स्टे. वडणेर येथे मो.सा. चोरीबाबत दाखल असलेले दोन गुन्हे उघडकिस आणले असुन, जप्त मुद्देमाल व आरोपीस पो.स्टे. वडणेर यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, संजय बोगा, शेखर डोंगरे, संघसेन कांबळे, अभिषेक नाईक, मिथुन जिचकार, विनोद कापसे, मुकेश ढोके, सर्व नेमणुक स्था.गु.शा. वर्धा व विशाल मडावी (सायबर सेल वर्धा) यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये