Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने निःशुल्‍क महाआरोग्‍य शिबीर

गांधी शाळा जुना बसस्‍टॉप बल्‍लारपूर येथे आरोग्‍य शिबीराचे आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

आरोग्‍यसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून समाजाचे शेवटच्‍या घटकातील व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबाचा आयुष्‍यामध्‍ये आनंद आणि समाधान देण्‍याचे ध्‍येय उराशी बाळगणा-या गोरगरीब व कष्‍टकरी माणसाला देव मानून सेवा हा धर्म हे सुत्र अंगीकारलेल्‍या संवेदनशील लोकनेते मा. ना. सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री यांच्‍या पुढाकाराने आयोजित निःशुल्‍क महाआरोग्‍य शिबीराचा लाभ घेण्‍यात यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दिनांक २५ ऑगस्‍ट २०२४ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत गांधी शाळा, जुना बसस्‍टॅन्‍डजवळ, बल्‍लारपूर (जि. चंद्रपूर) येथे निःशुल्‍क महाआरोग्‍य शिबीराचे मा. ना. सुधीर मुनगंटीवार तथा आशा हॉस्‍पीटल शंकरा सुपर स्‍पेशालिटी हॉस्‍पीटल, नागपूर व सर्जिकल ऑकोलॉजी कॅन्‍सर केअर सेंटर, मुंबई यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयो‍जन करण्‍यात आले आहे. या आरोग्‍य शिबीरामध्‍ये जनरल तपासणी, हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, कान,नाक व घसा तपासणी, जनरल शस्‍त्रक्रिया, स्‍त्री-रोग, बाल-रोग, त्‍वचा-रोग, श्‍वसन-रोग, दंत व मुख रोग, मानसिक रोग यासारख्‍या अनेक व्‍याधींवर उपायाकरिता आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे या आरोग्‍य शिबीराचा सर्वांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्‍यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये