Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील प्रत्येक घरावर दिमाखात फडकवा राष्ट्रध्वज – पालकमंत्री मुनगंटीवार यांचे नागरिकांना आवाहन

ध्वजारोहण करून ‘हर घर तिरंगा’ अभियानाला प्रारंभ

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी 

आशिष रैच, राजुरा

जिल्ह्यातील प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियान चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी करावा. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे होणार आहे. या निमित्ताने नामुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील निवासस्थानी ध्वजारोहण केले आणि अभियानाचा शुभारंभ केला.

ध्वजारोहणानंतर ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ‘हर घर तिरंगा… हर मन तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. ‘देशभक्ती ना हो क्षणिक उबाल… मन में पले वह पुरे साल’ अशी त्यामागची भावना आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला देशाच्या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करताना विकासात योगदान द्यायचे आहे, असा संकल्प प्रत्येकाने करावा.’

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात अभियान सुरू झाले आहे. तिरंगा यात्रा मनामनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. तिरंगा आपल्यासाठी प्राणप्रीय आहे. देशाची शान आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.

तिरंगा ध्वज हा केवळ चौकोनी कापडाचा तुकडा नाही. भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. लाखो शहिदांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर हा तिरंगा ध्वज हाती आला आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी हसत हसत देशासाठी आपले प्राण अर्पण केले. स्वतः च्या परिवारापेक्षा माझा देश म्हणजेच माझा परिवार या भावनेने त्यांनी आपले आयुष्य भारत मातेच्या चरणी अर्पण केले. अशा वीर शहिदांचे स्मरण करूया, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये