ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड जिल्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा, नागभीड, तळोधी कडकडीत बंद

नागभीड जिल्हा निर्मितीचा फलक घेऊन निघालेले मोर्चेकरी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी सुधाकर श्रीरामे

जिल्यातून चिमूर व ब्रम्हपुरी जिल्हा व्हावा याकरिता दोन आमदार प्रशासकीय घोडे बाजार करीत असताना नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असून सर्वाना मध्यवर्ती असून प्रशासकीय दृष्टयाभौगोलिक दृष्टया कसे सोईस्कर आहे. हे सांगण्याकरिता राजकीय वारसा नसल्याने “नागभीड जिल्हा व्हावा “या मागणीसाठी नागभीड जिल्हा कृती समितीच्या वतीने आज सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाची सुरुवात जिल्हा प्राथमिक शिक्षक सह प थ संस्था येथून करीत तहसील कार्यालय येथे नेण्यात आला मोर्चा तहसील कार्यालयात पोहचल्यानंतर सभेत रूपांतर झाले आणि नागभीड जिल्हा कायावर अनेकांनी मते मांडली आणि चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कसे गैर सोईचे आहे हे संबोधित करण्यात आले. नागभीड हे शहर सर्व जिल्ह्याना समा न अंतरावर असून भौगोलिक दृष्टया व प्रशासकीय आणि दळण वळण दृष्टया कसे सोईचे आहे हे सांगण्यात आले. एखाद्या जिल्याची निर्मिती व्हावी याकरिता जनतेचे मतप्रशासकीय दृष्ट्या सर्वाना कसे सोईस्कर होईल याचा विचार करण्यात यावा याकरिता नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या मागणीला साथ देत व्यापारी संघटनासामाजिक संघटना बार असोशियन आणि अनेक संस्थानी भाग घेत नागभीड सह तळोधी येथे कडकळीत बंद केला यामुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले. यावेळी पोलीस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाला अनेकांनी संभोधित करून मा तहसीलदार कावळे साहेब यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी तालुक्यातील सरपंच संघटनाअंगणवाडी संघटना सहभागी झाल्याचे दिसून आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये