Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’ १४ गावात लोकसभा निवडणुकीसाठी तेलंगणाची यंत्रणा सज्ज !

चार मतदान केंद्रावर होणार मतदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- नुकताच या सिमेवरील वादग्रस्त १४ गावात १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात झालेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यात येथील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आता १३ मे रोजी तेलंगणा राज्याच्या होवू घातलेल्या आदिलाबाद लोकसभा निवडणुकीतही मतदानाचा हक्क बजावणार असून चार मतदान केंद्रावर होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलंगणा राज्याची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

       चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील परमडोली, तांडा, कोठा, मुकादमगुडा, महाराजगुडा, इंदिरानगर, अंतापूर, शंकरलोधी,पद्मावती, पळसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा,येसापूर,लेंडीजाळा,या १४ गावांचा सिमावाद गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.दोन्ही राज्याच्या निवडणूक प्रक्रिया या गावात पार पडली जातात.५११७ मतदार असलेल्या या १४ गावात नुकताच महाराष्ट्र राज्याची चंद्रपूर-आर्णी,वणी लोकसभा निवडणूक प्रक्रिया कुंभेझरी, भोलापठार, महाराजगुडा,परमडोली,पुडियालमोहदा,वणी (खु) या सहा मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली.

आता आसिफाबाद जिल्ह्यातील केरामेरी मंडळ अंतर्गत येत असलेल्या या १४ गावात तेलंगणा राज्याची आदिलाबाद लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून परमडोली,मुकादमगुडा,अंतापूर,भोलापठार या चार मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून या निवडणुक कामांसाठी ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती तेलंगणा राज्यांकडून करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदाराला एकदाच मतदान हक्क बजावण्याचे निर्देश आहेत मात्र महाराष्ट्र राज्याची लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या २४ दिवसांनंतर तेलंगणा राज्याची आदिलाबाद लोकसभा निवडणूक होणार असल्याने महाराष्ट्रात मतदान केलेल्या मतदारांच्या बोटावरची शाही निघून गेली असून आता हेच मतदार पुन्हा तेलंगणा राज्याच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये