ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाईला तांत्रिक अडचणीचा खोडा

ईकेवायसीची वेबसाईट काम करेना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे सुरु आहे. शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना ईकेवायसी करणे आवश्यक आहे परंतु मागिल चार पाच दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे ईकेवायसी प्रकिया होत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे.

यावर्षी धान विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 20000 रुपये प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत 40000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले. पिएम किसान योजनेचे 6000 रुपये जमा झाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसान भरपाईची पहिली, दुसरी यादी आली तेंव्हा वेबसाईट उत्तमरित्या चालत होती. ज्या व्यक्तींनी ईकेवायसी केली त्या व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा झाले. माञ 2 एप्रिल ला तिसरी यादी आली ही यादी सर्वात मोठी असल्यामुळे महा ऑनलाईन वेबसाईटवर अतिरिक्त भार आल्यामुळे वेबसाईट उत्तमरित्या काम करीत नाही आहे.

अवकाळी पावसाचे कमीतकमी 2000 तर जास्तीत जास्त 40000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे याचे पैसे आले आहेत परंतु ईकेवायसी केल्याशिवाय खात्यात पैसे जमा होणार नाही आहेत. ईकेवायसी करण्यासाठी शेतकरी पहाटे चार वाजता पासून सेतू केंद्राच्या येरझाऱ्या मारीत आहेत परंतु वेब साईट चालत नसल्यामुळे आल्या पावली परत जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.

 माझ्या शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळें पैसे आले आहेत माञ ईकेवायसी होत नसल्यामुळे पैसै जमा झाले नाही. सरकारने लवकरात लवकर वेबसाईट दुरूस्त करून आम्हा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

*हरिदास मेश्राम एक शेतकरी भट्टी जांब*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये