ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पहिल्या आठवडयात ३ सराईत गुन्हेगार व दुसऱ्या आठवडया मध्ये ३ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

चांदा ब्लास्ट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस सक्रिय झाला असुन मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, मा. रिना जनबंधू, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई ची धडक मोहीम हाती घेतली आहे.

आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या तोंडावर जिल्हयात शांतता अबाधित राखण्याकरीता चंद्रपूर जिल्हयातील शरीरा विरुध्द व मालमत्ते विरुध्दचे सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासंबंधाने मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी आदेश पारीत करताच पो. स्टे. चंद्रपूर येथील १) शुभम अमर समुद, वय २६ वर्ष रा. पंचशिल वार्ड चंद्रपर पो. स्टे. रामनगर रामनगर येथील २) शाहरूख नुरखा पठाण वय २९ वर्ष रा. अष्टभुजा वार्ड जयश्री लॉन जवळ चंद्रपूर ३) नैनेश उर्फ लाला नितीन शहा वय ३१ वर्ष रा. लुंबिनी नगर बाबुपेठ वार्ड चंद्रपूर यांना तसेच मोहशन केशव कुचनकर वय २५ वर्ष रा. चिरघर लेआउट वरोरा ता. वरोरा यांना मागील आठवडयामध्ये कलम ५६ (१) (अ) (ब) मपोका अन्वये ६ महिन्यात करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.

तसेच दुसऱ्या आठवण्यात पो. स्टे. बल्लारशाह येथील १) दर्शन उर्फ बापु अशोक तेलंग वय २२ वर्ष रा. मौलाना आझाद वार्ड बललारशाह, पो. स्टे. नागभिड येथील २) मुनिर खान वहीद खान पठाण वय ५५ वर्ष रा. शिवनगर नागभिड ता. नागभिड, पो. स्टे. ब्रम्हपुरी ३) शिवशांत उर्फ भिस्सु दामोधर भुर्रे वय २५ वर्ष रा. हनुमान नगर ब्रम्हपुरी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर यांना कलम ५६ (१) (अ) (ब) मपोका अन्वये ३ व ६ महिन्यात करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, श्री. मुम्मका सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर रिना जनबंधू मॅडम यांचे मार्गदर्शनात मा. नाओमी साटम, उविपोअधि, वरोरा, मा. सुधाकर यादव, उविपोअधि, चंद्रपूर, मा. दिपक साखरे, उविपोअधि, राजुरा, मा. दिनकर ठोसरे, उविपोअधि, ब्रम्हपुरी, श्री. महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपूर तसेच पोलीस निरीक्षक पो. स्टे. बल्लारशाह आसिफराजा, पो. नि. पो. स्टे. ब्रम्हपुरी, अनिल जिटटावार, पो.नि. पो. स्टे. नागभिड, विजय राठोड, यांनी मोलाची कामगिरी बजावुन आता पर्यंत नमुद सराईत इसमांना चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये