ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम साजरा

सर्व विद्यार्थी प्राध्यापक, कर्मचारी यांनी पंचप्राण शपथ घेतली

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी माटी, मेरा देश अभियान (माझी माती, माझा देश) अभियान साजरा करण्यात आला, त्यामध्ये सर्वप्रथम मातीला नमन, वीरांना वंदन करीत संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर, सचिव  प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख सर, प्रा. मस्के सर, रजिस्टर बिसेन सर, सर्व विद्यार्थी प्राध्यापक, कर्मचारी यांनी पंचप्राण शपथ घेतली.

या अभियाना अंतर्गत आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ सोमय्या पॉलीटेक्नीक येथे शपथविधी कार्यक्र माची माहिती विध्यार्थाना सांगत असताना भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला महासत्ता देश आहे. देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रन्तिकारक, स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक, जात अजात देश वासियांनी प्राणांची आहुती दिली, त्याच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. तसेच मेरी माती मेरा देश या अभियान अंतर्गत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व देशवीरांना वंदन तसेच नतमस्तक होऊन अभिवादन करण्याची संधी प्रत्येकाना मिळाली आहे. तसेच त्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकानी देशाच्या, प्रगतीसाठी प्रयत्न करावे.

या अभियानातंर्गत शीलाफलक वसुंधरा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन, पंचप्राण (शपथ घेणे), ध्वजारोहण व राष्ट्रगान अशा पाच उपक्रमातून क्रांतिकारक व आपल्या मातीविषयी जणजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यास मदत होणार आहे, एकता व बंधुता टिकवून ठेवणे, विध्यार्थानी आदर्श नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे, तसेच देशाचे रक्षण करण्याऱ्या प्रति तत्पर व व्यक्त करणे असे ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाहेतू आहे.

प्रा. पोहनकर, प्रा. सुत्राळे, प्रा. नागराळे, प्रा. आंबटकर, प्रा. बोबडे, प्रा. बल्लमवार, प्रा. कोटकर, प्रा. जंगम, प्रा. रेवतकर, प्रा. चव्हाण,प्रा.ठाकरें,प्रा.बाबरे, प्रा. केटी, प्रा. सोडवले, प्रा. तरवटकर, प्रा. डे, प्रा. एकरे, प्रा. जेणेकर, प्रा. रगाताटे, प्रा. पाटील ,प्रा.कारेमोरे, प्रा. दत्ता, प्रा. कुलकर्णी, प्रा. कुमार, ग्रंथपाल घाटे, सोनटक्के आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शपथ घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये