ग्रामीण रुग्णालयात डिजीटल नोंदणी केंद्राचे आ. देवतळे यांच्या हस्ते उद्घाटन
केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा नागरिकांना मिळणार लाभ
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ शहर तथा ग्रामीण भागातील नागरीकांना मिळावा यासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात डिजीटल नोंदणी केंद्राचे उद्घाटन आ.करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले.त्याचप्रमाणे रुगालयात एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.आढावा बैठकीत रुग्णालयात ऊपलब्ध नसलेल्या सोनोग्राफी सेंटर,डायलेसीस तथा रक्त संकलन केंद्र सुरु करण्याची मागणी सदर आढावा बैठकीतून करण्यात आली.
शासनदरबारी याबाबत पाठपुरावा करुन या सर्व सुविधा येथील रुग्णालयात ऊपलब्ध करण्यात येईल असे आश्वासन यावेळी आ.करण देवतळे यांच्याकडून देण्यात आले.ग्रामीण रुग्णालयाचे आमदार प्रतिनीधी म्हणून यावेळी गोपाल गोसवाडे यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डा.मनीष सींग व इतर मान्यवर ऊपस्थीत होते.