ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केला महिलांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जागतिक महिला दिन चे औचित्य साधून देऊळगाव राजा येथे विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये राजकीय, सामाजिक, कला,पत्रकारिता, व इतर क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करण्यात आला, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषद च्या माजी गटनेत्या सुनीता ताई सवडे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्ष रेखाताई पवार, महिला पोलीस कर्मचारी शितलताई नांदे,गायिका प्रीत पाटील,पत्रकार किरण वाघ,व उषा डोंगरे,समाजसेविका माया खरात यांचा संविधान उद्देशिका व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात,पत्रकार मुन्ना ठाकूर,संतोष पिंपळे,आकाश कासारे,विशाल पवार,पत्रकार विजय जाधव,योगेश खरात आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये