ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

251 प्रकरणांना मंजुरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथील सभागृहात संपन्न झाली. यावेळी सदर योजनेतील सुमारे 251लाभार्थ्यांची प्रकरण मंजूर करण्यात आली.

त्यात अपंग, निराधार, विधवा, परित्यगता, अविवाहित, दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण, वृद्ध आदी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. सदर लाभार्थ्यांना तात्काळ या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुढील कार्यवाही केली जात आहे.

याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री समीर केने, सचिव नायब तहसीलदार महेंद्र फुलझले, अजय मल्लेलवार,सदस्य सौ वैशालीताई जोशी श्री किशोर मोहुर्ले, श्री रमेश पिपरे, श्री अनिल मोरे यांच्या तसेच इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये