Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, चे बल्लारपुर आवारात 'घर तिथे रांगोळी' या अभियानाअंतर्गत कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

बेटी बचाओ बेटी पढाओ ही राष्ट्रव्यापी चळवळ, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी मुलींच्या उत्थानासाठी सुरू केली आहे. एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, चे बल्लारपुर आवारात ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाअंतर्गत राबविण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थीनींनी उस्फुर्तपणे यात सहभाग घेतला कार्यक्रमाला परिक्षक म्हणून प्रा. विभावरी नखाते आणि प्राजक्ता पाटील यांनी परिक्षण केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संचालक डॉ. राजेश इंगोले तसेच समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कोमल आगलावे ; मीना राऊत यांनी प्रथम पारितोषिक तर पुनम शर्मा ; प्रतिक्षा कुंभारे यांना दुत्तिय पारितोषिक मिळावीले. उपस्थित प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा गिरडकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये