Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

युवा नेतृत्व व श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने कोरपना तालुक्यातील वडगाव येथे युवा नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल माहुरे, उपसरपंच सुदर्शन डवरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम भोंगळे, शाळा समितीचे अध्यक्ष मुकेश निमकर, एस. एल. परचाके मुख्याध्यापक जि. प. उच्च प्राथ. शाळा वडगाव, ज्येष्ठ प्राध्यापिका नंदा भोयर व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर थिपे यांनी केले, अहवाल वाचन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदिप परसुटकर यांनी केले तर आभार प्रा. नरेंद्र हेपट यांनी मानले. या कार्यक्रमात रा.से.यो. विद्यार्थी प्रतिनिधी प्रसराम चावरे व गौरी हनुमंते या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच वडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये