श्रीतेज प्रतिष्ठाना मार्फत आतंरराष्ट्रीय योग दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- श्रीतेज प्रतिष्ठान गडचांदूर व महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ चा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे डॉ. संजय आसुटकर, अंजली खेतान, आणि मिलिंद गंपावार यांनी योगासने, प्राणायाम व ध्यान यांच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष योग सत्राच्या माध्यमातून सहभागींचा उत्साह वाढवून योगाच्या जीवनातील भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे शारीरिक स्वास्थ्य वृद्धिंगत करणे, मानसिक शांतता आणि अंतःशांतीचा प्रसार करणे, तसेच समाजात एकतेचा संदेश पोहोचवणे होते.
कार्यक्रमात श्रीतेज प्रतिष्ठानचे सदस्य, स्थानिक नागरिक, योगप्रेमी आणि विद्यार्थी यांनी शेकडोंच्या संख्येने सहभाग घेतला.
विशेष अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या सौ. चिताडे यांनी उपस्थिती दर्शवली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम यांनी केले, तर प्रभावी सूत्रसंचालन हरिहर खरवडे यांनी पार पाडले.
गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा योग दिन कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्वांना आरोग्यदायी, तणावमुक्त व समतोल जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रीतेज प्रतिष्ठान, गडचांदूर मार्फत करण्यात आले.