ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ ही संकल्पना प्रेरणादायक – सुरेन्द्र उमाटे

रोव्हर्स-रेंजर्स व रासेयो स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छ करून संत गाडगेबाबांना केले अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘ संत गाडगेबाबा यांनी आपल्या ग्राम स्वच्छता अभियानातून ‘गाव निरोगी तर लोक निरोगी’ हा संदेश दिला. दिवसा ग्राम स्वच्छता तर सायंकाळी मन स्वच्छतेवर ते भर द्यायचे. यात लोक सहभाग फारच महत्वाचा घटक असून या दृष्टिकोनातून रोव्हर्स रेंजर्स व राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा सुरू केलेली ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ ही संकल्पना प्रेरणादायक आहे, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा पथक व रोव्हर-रेंजर युनिट द्वारा संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘परिसर स्वच्छता अभियानाच्या समारोप प्रसंगी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा स्काऊटचे सहाय्यक जिल्हा आयुक्त सुरेंद्र उमाटे यांनी 20 डिसेंबर रोजी केले.

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील रोव्हर्स रेंजर्स युनिट व रासेयो पथकाने महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरेंद्र उमाटे, स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. मेघा फासगे, प्रा. विवेक देशमुख, प्रा. ममता पिलेवान, प्रा. डाॅ. गजभिये, रोव्हर लिडर संतोष तुरक, सहाय्यक रोव्हर लिडर आसीफ शेख व संकेत हिवंज उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. रासेयो स्वयंसेवकांनी ‘हम युवा प्रहारी हम बढे चलो….’ या गीताने केली. महाविद्यालयातील दोन एकर परिसर स्वच्छ करून संत गाडगेबाबा यांना अभिवादन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी स्वच्छता अभियानाचे महत्व सांगीतले.

कार्यक्रमाचे संचालन रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीश यावले तर आभार सहाय्यक रोव्हर लिडर संकेत हिवंज यांनी मानले.

यशसवीतेकरीता रोव्हर शेखर भोगेकर, अक्षय जबडे, वैष्णवी शिरभाते, साहील रामगडे, आदित्य तिमगाडगे, हरिओम उईके, हर्षदीप झाडे, सुप्रिया यादव, साक्षी येळणे, मनिषा मडका, श्रद्धा मडावी, अंजली कामडी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये