ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वरोरा तालुक्यातील महत्वाच्या रस्त्याला २६४.५३ कोटी मंजूर
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश

चांदा ब्लास्ट
जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील कोसार – सोईत – मुधोली – वरोरा पवना – वेळगाव – चंदनखेडा – मोहुर्ली रामा – ३७१ किमी ७/१५५ ते ४०/२०५ (एकूण लांबी = ३३.७० ) रस्त्याची सुधारणा करणे (भाग – कोसरा – वरोरा – पावना) या रस्त्याला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB ) अंतर्गत २६४.५३ करोड रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, व्यापारी वर्गासाठी, ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थ्यांसाठी मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
या रस्त्याची लांबी ३३.७० किलोमीटर आहे. हा रस्ता वरोरा तालुक्यातील कोसार, सोईत, मुधोली, वरोरा पवना, वेळगाव, चंदनखेडा, मोहुर्ली या गावांमधून जातो. हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत होता. या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण होते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांपासून ते व्यापारी वर्गापर्यंत अनेकांची होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील व ताडोबा जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गामुळे प्रवास करणे सुलभ होणार आहे.
या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तत्कालीन दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनीही हा प्रश्न लावून धरला होता.
या रस्त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सुद्धा हा प्रश्न लावून धरला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या रस्त्याला ADB अंतर्गत २६४.५३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
या रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना, व्यापारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे सोपे होईल. त्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळेल.