वर्धा उपविभागीय पथकाकडुन देशी-विदेशी दारूचा 5 लाख 70 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 10/12/2023 रोजी मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी बोथरा, वाडया जवळ, हनुमान नगर, वर्धा येथे आरोपीतानवर प्रोव्हीशन रेड केला असता यांतील आरोपीतांना पोलीस आल्याची चाहुन लागताच आरोपी क्र 2) आकाश पुसदेकर रा. बोरगांव मेघे, वर्धा 3) पारीकेत खडसे रा. हनुमान नगर, वर्धा हे मौक्यावरून फरार झाले मौक्यावरून आरोपी नामे 1) वेदांत जितेन्द्र गडकरी वय 19 वर्ष रा. हनुमान नगर, वर्धा हा मिळुन आला त्याचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती चारचाकी होन्डाई कंपनीची होन्डा सिटी झेड एक्स क्र. एम.एच/48/ई / 0130 सिल्वर रंगाची किंमत अंदाजे 5,00,000/- रू त्या मध्ये 2) 90 एम.एल. च्या देशी दारूने भरून असलेल्या टॅगो कंपनिच्या 2 खर्रडयाचे पुर्ण खोक्यामध्ये तसेच 1 अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये व चुगडीत एकुण 320 शिश्या प्रति नग 80/- रू प्रमाणे एकुण 25,600/-रू. 3) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या 1 अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये ऑफीसर चॉईस ब्लु कंपनिच्या शिश्या अशा एकुण 42 शिश्या प्रति नग 300/-रू प्रमाणे एकुण 12,600/-रू. 4) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्ट्रॅग (आरएस) कंपनिच्या 1 अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये एकुण 36 शिश्या प्रति नग 350/-रू. प्रमाणे एकुण 12,600/-रू 5) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या प्लॉस्टीक चुगंडी मध्ये ऑफीसर चॉईस कंपनिच्या शिश्या अशा एकुण 50 शिश्या प्रति नग 250/-रू प्रमाणे एकुण 12,500/-रु. 6) एक जुना वापरता आयटेल कपंनीचा मोबाईल की 7,000 रू असा एकुण जु. किंमत 5,70,300/-रु. चा माल अवैध्यरित्या संगणमताने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.
आरोपीतांनी देशी / विदेशी दारू बाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी सांगीतले की, विदेशी दारूचा माल हा राजु जयस्वाल रा. सावंगी मेघे, वर्धा यांचे उदय बार मधुन आणला. बारचे चालक / मालक राजु जयस्वाल यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपीतांना दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्यांचे कृत्य कलम 82, म.दा.का. प्रमाणे होत असल्याने सदर मालक / चालक राजु जयस्वाल यास आरोपी बनविण्यात आले.
केलेल्या कार्यवाही संबधी पोलीस स्टेशन वर्धा शहर, येथे चारही आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक 1588/2023 कलम 65, (अ) (ई) 77 (अ), 82, 83 म.दा.का अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर, येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री रोशन भु.पंडीत सा. याचे सुचनेप्रमाणे, पो.उप.नि परवेज खॉन, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो. हवा. अमर लाखे, पो. शि, पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.
(रोशन भु. पंडीत) उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा