ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे 28 फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख अतिथीम्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षिका सौ विना देशमुख होत्या. सर्वप्रथम डॉ. सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सहाय्यक शिक्षक श्री प्रशांत धाबेकर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व विशद केले तसेच,विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन कशा प्रकारे रुजवावा याबद्दल मार्गदर्शन केले याप्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये