ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साहसी व जागरूक युवा पिढी घडविण्याचा उपक्रम प्रशंसनीय’ – राहुल कर्डिले

'प्रहार' संस्था व रोव्हर- रेंजर चा 'साहस व निसर्ग अभ्यास शिबिराचे' आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- ‘सुजान नागरिक घडवण्याची प्रक्रिया शालेय जीवनापासूनच सुरू झाली पाहिजे. मुलामुलींना बालपणापासूनच विविध उपक्रमात सहभागी केले पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रहार समाज जागृती संस्था साहसी नागरिक तयार करण्याचे शिबिरे घेऊन तरुण-तरुणींना जागरूक नागरिक तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदर साहसी व जागरूक युवा पिढी घडविण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे’, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्थानिक निसर्ग सेवा समितीच्या ‘ऑक्सिजन पार्क’ परिसरात सुरू असलेल्या ‘साहस व निसर्ग अभ्यास शिबिरास’ दिलेल्या भेटीदरम्यान रोहर रेंजर्स स्काऊट गाईड सोबत संवाद करताना 26 नोव्हेंबर रोजी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रमेश कोळपे, माजी प्राचार्य डॉ अशोक मेहरे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रहार संस्थेचे सचिव संतोष तुरक व रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त तथा प्रहार संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

प्रहार’ समाज जागृती संस्था व रोव्हर रेंजर पथक यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय साहस व निसर्ग अभ्यास शिबिराचे आयोजन निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्क मध्ये करण्यात आले. यात देवळीचे एसएस एन जे महाविद्यालय, संदिपनी स्कूल व सोमवार हायस्कूल वर्धा येथील ६५ स्काऊटस, गाईड्स, रोव्हर्स व रेंजर्सचा समावेश असून शिबिरात निसर्ग अभ्यास प्रशिक्षण, प्रहारचे साहसी प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन व व्यक्तिमत्व विकास उपक्रमांचा समावेश आहे.

शिबिरादरम्यान “पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण प्रकल्प व घनदाट जंगल उभारण्याचा प्रकल्पाची माहीती निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी दिली.

सदर ‘ऑक्सीजन पार्क’ मध्ये असलेल्या ‘झाडांचे वाचनालय’, ‘चला बोलू या झाडांशी’, ‘पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण प्रकल्पाची माहिती निसर्ग अभ्यास कार्यशाळेतील सहभागी शिबिरार्थ्यांना देण्यात आली. यावेळी ‘संविधान दिना’ निमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले तसेच अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदार प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

शिबिरात स्थानिक संदीपनी स्कूलचे कब स्काऊट शिक्षक सुबोध ठकरे, स्काऊट मास्टर अभिजीत पारगावकर, सहा. रोहर लीडर संकेत हिवंज, योगेश आदमने, आसिफ शेख अक्षय जबडे, शेखर भोगेकर, राखी खोडे, वैष्णवी शिरभाते व साहिल रामगडे ‘प्रशिक्षक’ म्हणून कार्यरत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोव्हर लीडर तथा जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर तर निसर्ग सेवा समितीच्या कार्यक्रमाचा आढावा मुरलीधर बेलखोडे यांनी दिला. संचालन राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वयक रोव्हर लीडर प्रा. रवींद्र गुजरकर यांनी तर प्रहार संस्थेचे सचिव रोव्हर लीडर संतोष तुरक यांनी मानले.

कार्यक्रमाची सांगता प्रहार समाज जागृती संस्थेचे एकात्मता गीत ‘हम युवा प्रहारी, हम बढे चलो, बढे चलो’……….. या प्रेरणा गीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये