Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुकडोजीनगर येथे वंदनीय तुकडोजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

यावेळी परिसरातील नागरिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा मंडळ तुकडोजी नगर तालुका कोरपना च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम तुकडोजी नगर येथे पार पडला.

यानिमित्त ग्रामस्वच्छता अभियान घटस्थापना सामूदायिक ध्यान, रामधून,भजन, किर्तन पालखी, कलश मिरवणूक, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून ह भ प बापूजी पिंपळकर, कार्यक्रम अध्यक्षस्थानी ह भ प खुशालराव गोहोकार महाराज, तर प्रमुख अतिथी म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती श्याम रणदिवे, विनोद नवले, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रिया खाडे, सरपंच नैनेश आत्राम, जगन्नाथ बाबा संस्थान भांडेवाडा अध्यक्ष बबनराव धानोरकर, श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक अड राजेंद्र जेनेकर, मंडळाचे अध्यक्ष डॉ शंकरराव गिरडकर, विनायक मोहितकर रामचंद्र बावणे नागेश्वर पिदुरकर विजय पिंगे, आडकु कुळसंगे, विजय आवारी, सुरेश धवणे, ह भ प भुसारी महाराज, ह भ प गुरुनुले महाराज, ह भ प किनाके महाराज, ह भ प भेंडाळे महाराज, ह भ प मरापे महाराज, कीर्तनकार डाखरे महाराज, धानोरकर ताई , कवडू बोरडे, अख्तर भाऊ गांधीनगर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन हनुमान सुरपाम तर आभार नत्थु भोयर यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये