ताज्या घडामोडी

शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि निळकंठराव शिंदे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट –

भद्रावती दि. २८ (तालुका प्रतिनिधी) निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २८ डिसेंबरला शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हर्षा दुधे, तालुका निरीक्षण अधिकारी, प्रवीण चीमूरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जि. चंद्रपूर, वामन नामपल्लीवार, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती, जिल्हा संघटक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर, पुरूषोत्तम मत्ते, मार्गदर्शक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. लेमराज लडके यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकातुन वसंत वर्हाटे यांनी ग्राहक चळवळ ते ग्राहक संरक्षण कायद्यापर्यंतचा इतिहास सांगितला. प्रवीण चीमूरकर यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ आणि २०१९ मधील फरक, ग्राहकांचे अधिकार तसेच ई- कॉमर्स आणि डिजीट ट्रेड याविषयी विस्तृत माहिती दिली. वामन नामपल्लीवार यांनी विविध विभाग आणि ग्राहक तक्रारी याबद्दल मार्गदर्शन केले. कोणतीही वस्तू ही स्थानिक दुकानातून घ्या, ऑनलाईन खरेदी करू नका असे आवाहन केले. हर्षा दुधे यांनी ग्राहक संरक्षण कायदा, ऑनलाईन फसवणुक आणि त्याबद्दल कायद्यातील तरतुदी विषयी माहिती दिली. पुरूषोत्तम मत्ते यांनी गॅस, विज समस्या याबाबत बोलले तसेच त्यांनी ग्राहक म्हणून फसवणुक झाल्यास ग्राहक पंचायत कडे येऊन तक्रारी देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य लडके यांनी ग्राहक कायदा आपल्या अनुभवातुन काय आहे आणि ग्राहकांसाठी किती मजबूत कायदा आहे याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. अपर्णा धोटे , प्रास्ताविक वसंत वर्हाटे तर आभार प्रा. कुलदिप भोंगळे यांनी केले. कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती चे अशोक शेंडे, बालाजी दांडेकर, ढवळे, गुलाब लोणारे, शिला आगलावे, माया नारळे, साखरकर, लिला ढवळे, चामाटे, आण्याजी ढवस, प्रभात तन्नीरवार, संपूर्ण पदाधिकारी, महिला कार्यकारीणी, महाविद्यालयातील डॉ. किरण जुमडे, प्रा. सचिन श्रीरामे अन्य प्राध्यापक, कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात विध्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये