ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिलांनी केले गौराईचे मोठ्या उत्साहात विसर्जन

तलाव नदी नाल्यावर महिलांची मांदियाळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शहरात महिलावर्गातर्फे हरीतालीका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज दिनांक 19 रोज मंगळवारला घराघरातून स्थापण केलेल्या गौराईंचे शहरातील तलाव व नदीत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. दिनांक 18 ला हरीतालीका उत्सवानिमित्त शहरातील महिलांनी घराघरातून गौराईची स्थापना केली. या दिवशी गौराईचे विधीवत पुजन करुन ऊपवासाचे व्रत ठेवण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सकाळपासून शहरातील विवीध तलावात तसेच नदी, व कोंढा नाला येथे गौराईच्या विसर्जनाला सुरुवात झाली. गौराईचे हे विसर्जन दुपारी उशिरापर्यंत सुरु होते. विसर्जनासाठी शहरातील महिलांनी तलावावर, नदी व नाल्यावर मोठी गर्दी केली होती. कोणतिही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विसर्जनासाठी नगर परीषद प्रशासनातर्फे गवराळा तलावाजवळ कृत्रीम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये