गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूसह इतर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 27/07/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक पो. स्टे. रामनगर हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करिता पेट्रोलिंग करत असताना हिंदनगर व शांतीनगर येथे राहणारे 1) संदीप दिनकर माणिककुळे, वय 37 वर्ष, रा. हिंदनगर, सिंधी मेघे, वार्ड क्र. 2 वर्धा.
2) आकाश शिवप्रसाद पांडे, रा. आकरे ले आउट, वार्ड क्र. 3 सिंधी मेघे, वर्धा. 3) अमोल अशोकराव झाडे, वय 31 वर्ष, रा. शांतीनगर, सिंधी मेघे, वार्ड क्र. 4 वर्धा. हे आपले राहते घरी प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू ,पान मसाला व गुटखा याची साठवणूक करून तसेच खर्रा तयार करण्याच्या मशीनचा वापर करून सुगंधित तंबाखू मिश्रित खर्रा विक्री करीत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकारी श्री. गेडाम, यांना देऊन त्याचे सोबत पंचासमक्ष आरोपी क्रमांक 1 ते 3 यांचे घरी छापा घातला असता वेगळ्या वेगळ्या कंपनीचा सुगंधित तंबाखु, पानमसाला व गुटखा असा एकुण वजन 132.18 किलोग्रॅम किंमत 1,17,378 /-रु व खर्रा तयार करण्यासाठी लहान मोठ्या एकूण 12 मशीन किंमत 1,30,000/- रु असा एकूण जु. किं. 2,47,378/-रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त केला.

आरोपीस सदरचा माल कुठून आणला याबाबत विचारपूस केली असता सुगंधित तंबाखू अमरावती, नागपूर येथून आणल्याचे सांगितले वरून वरिल आरोपी विरुद्ध पो. स्टे. रामनगर येथे अपराध क्रमांक 660 /2023 कलम 188, 272, 273, 328 भा.दं.वि. सहकलम 26(1), 26(2)(iv), 27(3)(e), 30(2)(a), 3(1)(zz)(iii), 59 अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्या खालील नियम व नियमन 2011 कायद्याने गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे सपोनी. संतोष दरेकर, पो उपनी. अमोल लगड, सफौ संतोष दरगुडे, मनोज धात्रक, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, नरेंद्र पारशर, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, संजय बोगा, रामकिसन इप्पर, पवन पन्नासे, नितीन इटकरे, संघसेन कांबळे, विनोद कापसे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली*

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये