गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समुद्रपूर पोलीसांकडून ईटलापूर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम

एकूण जु.किं. 63 हजार 900 रू. चा मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्ह्याची हकित याप्रमाणे आहे कि, मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून नमुद पंच व पो.स्टाफसह मौजा ईटलापूर पारधी बेडा येथे वाॅशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान आरोपी क्र 1 चे घरझडतीत दोन प्लास्टीक कॅन मोहा दारूने भरलेले जु.किं. 6,400 रू. माल मिळून आला असून, पारधी बेड्यामागील झुडपी शेतशिवारामध्ये आरेापी क्र 2 हिचे ताब्यातून 16 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये अंदाजे 900 ली. कच्चा मोहा सडवा रसायण, मोहा दारू, गुळ, दोन जर्मन घमेला व भट्टी साहित्य असा जु.किं. 57,500 रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने, मोक्कावरचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, एकुण *जु.किं. 63,900 रू. चा मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला. दोन्ही आरोपी 1) अंबर मुन्ना भोसले, वय 22 वर्ष, रा. वायगाव गोंड, ह.मु. ईटलापूर पारधी बेडा, तह. समुद्रपूर, 2) नमिता राजू भोसले, वय 39 वर्ष, रा. ईटलापूर पारधी बेडा, तह. समुद्रपूर विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. करीता सदरचा अहवाल माहितीस्तव सविनय सेवेशी सादर आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डाॅ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. मा. श्री. एस.बी. शेगांवकर सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे व गृहरक्षक दलाचे सैनिक ताराचंद नौकरकर, योगेश चैधरी, पंकल फुलझले यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये