ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

निराधार योजनेचे अनुदान मिळण्यासाठी अ. भा. मादगी संघटने तर्फे निवेदन

मागिल तीन महिन्यापासुन अनुदान रखडलेले ; विधवेचा मुलगा २५ वर्षांचा झाल्यास अनुदान बंद करु नका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेचे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनचे अनुदान मागील तिन महिन्यापासून निराधार, विधवा, अपंग व्यक्तींना मिळाले नाही.
त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या विधवा महिलेचा मुलगा २५ वर्षांवरील आहे त्यांचे अनुदान बंद करण्यात आलेले आहे. एखादी पेन्शनर महिला असेल आणि तिचा मुलगा २५ वर्ष पुर्ण केला असेल तर त्या महिलेचा पेन्शन बंद केल्या जात नाही आणि विधवेचेच अनुदान का बंद केल्या जातो या दोन मागण्यासाठी सावली तहसिलदारामार्फत शासनाला जॉब विचारण्यासाठी निराधार, विधवा, अपंग तर्फे तहसिल कार्यालय सावली येथे निवेदन देण्यात आले.

गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढली म्हणून अक्षय भालेराव यांचा खूण करणाऱ्यांना फाशीची सजा देण्यात यावी. अशा मागणीसाठी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रुपचंद लाटेलवार, जिल्हा अध्यक्ष अनिल बोटकावार, तालुका अध्यक्ष रमेश लाटेलवार, तालुका विभागीय अध्यक्ष सुनिल कोरवार, कोषाध्यक्ष विनोद गोरडवार, सामाजिक कार्यकर्ते नारायण सेमस्कार, तसेच निराधार, विधवा, अपंग अनेक लाभार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये