सांवगी मेघे पोलीसांकडुन अवैध ई सिगारेट साठवणूक
तसेच अवैध डिझेल साठवणूक करणाऱ्यावर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 18/03/2025 रोजी पोलीस स्टेशन सावंगी मेघे पोलीसांना माहिती मिळाली की सावंगी मेघे हद्दीतील टेक्सॉस स्मोक नावाचे दुकानात अवैधरीत्या बिना पासपरवाना ई सिगारेट बाळगून त्याची विकी करीत आहे अषा खबरेवरून त्याचेवर रेड केला असता आरोपी नामे १) संदिप पवन सोलंगी वय 24 वर्ष रा. चिखली माळोदे ता काटोल जि नागपुर ह.मु सावंगी मेघे वर्षा. 2) यश राजकुमार वाघमारे वय 20 रा सावंगी वर्धा यांचे दुकानाचे झडती मधून वेगवेगळ्या विदेशी बनावटी ई सीगारेट वेगवेगळे फ्लेवरच्या एकुण चाप्रती नग 7000/- रु प्रमाने 49,000/- रुप 2) वरिल दोन्ही ईसमांचे ताब्यात बनावटी ई सीगारेट विकणे करीता वापरण्यात येत असेलेले दोन मोबाईल ज्यात (अ) संदीप सोलंकी चे ताब्यातील बन प्लस कम्पनीचा मोबाईल हॅण्डसेट ज्याचा आयएमईआय नं. 866185057807516, 865185057807508 असा असुन त्यात जिओ सीम असलेला कि. 20,000/-रु (ब) यश वाघमारे यांचे ताब्यातील मोटोरोला कंम्पनीचा मोबाईल हॅण्डसेट ज्याचा आयएमईआय न. 35216663423897913,35216663423898713 असा असुन त्यात जिओ सीम असलेला कि. 20000/-रु असा एकूण जुमला कि 89,000/- रु चा माल अवैधरित्या बिना मासपरवाना पंचासमक्ष मिळून आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून आरोपीतांन विरुज्द गुन्हा क. 247/2025 कलम 4.7 प्रोव्हिबीशन ऑफ ई सिगारेट (उत्पादन आयात निर्यात वाहतूक विकी साठवणूक व जाहिरात प्रतीबंधक अधि. 2019) कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
तसेच दि. 21/03/2025 रोजी माहिती मिळाली की मौजा सेलूकाटे येथे राहणारा फतन सुखचंद धुवारे वय 39 रा. सेलूकाटे आपले राहते घरी व उभ्या असलेल्या त्याच्या महिंद्रा स्कार्पीओ गाडीमध्ये अवैध डिझेलची साठवणूक करीत आहे, अशा माहितीवरून पोस्टाफ व पंचासह रेड केला असता त्याचे घरासमोर उभी असलेली महिंद्र स्कारपीओ गाडीमध्ये 1) तीन मोठ्या प्लास्टीक कॅनमध्ये प्रती कॅन 22 लि. प्रमाणे एकुण 66 लि. डिझल प्रती लि. 91/रु. प्रमाणे किं. 6006/रू. 2) डिझल भरण्याकरिता वापरलेल्या प्लास्टीक च्या तीन कॅन प्रती कॅन 20 ०रू. प्रमाने एकुम 600रू. 3) एक मोठ्या पांढ-या रंगाच्या प्लॉस्टीक चाडी कि.50रु.4) एक प्लास्टीक नळी किं. 50/रू. (5) महिंद्र स्कारपीओ गाडी क्र.उम्-31-2-6864 किमंत 3००००० असा एकुण जु.किं. 306.706/ रु.चा माल मिळून आल्याने घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करून नमुद आरोपी विरुरद गुन्हा क. 251/2025 कलम 3,7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 सहकलम 288 भा. न्या. संहिता 2023 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री संदिप कापडे सा. ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे पो. उपनि दुधाने, पोउपनि खोब्रागडे, पोउपनि नबी शेख, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा सतिष दरवरे, संजय पंचभाई, अनिल वैदय, निखील फुटाणे, अमोल जाधय स.फी. विलास भेंडे यांनी केलेली आहे