ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरीच्या वतीने गर्भवती मातांना प्रोटीन पावडर व खाद्य पदार्थ वितरण

चांदा ब्लास्ट

ग्रामीण भागातून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची प्रकृती निरोगी राहावी बाळ सदृढ व्हावे यासाठी रोटरीच्या वतीने गर्भवती महिलांना प्रोटीन पावडर व खाद्य पदार्थ वितरण करण्यात आले आहे.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष अनुप यादव, उपाध्यक्ष कुंजबिहारी परमार, रवींद्र जैन, डॉ. आसावरी देवतळे, मिलिंद बोडखे, अजय पालारपवार, मनीषा पडगेलवार व डॉ. धनश्री शेंडे उपस्थित होते. यावेळी रोटरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुप यादव यांनी गर्भवती महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, आई ही आपल्या बाळाचे संगोपन चांगल्या प्रकारे करू शकतात. बाळाच्या भविष्य उज्जव करू शकतात. या देशात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मातांनी घडवले आहे. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी गर्भवती मातांना मोलाच मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिचारिका उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये