ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वन विभागच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास वनरक्षक वनपाल संघटनेचा आंदोलनाचा इशारा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना नागपुर, शाखा बुलढाणा व्दारे कर्मचारी च्या सेवा विषय तसेच कर्तव्य बजावत असताना उद्भवल्यालेल्या अडीअडचणी/ समस्या बाबतीत संघटनेनी वेळोवेळी निवेदन देवून सुध्दा वरिष्ठानी यांनी दुर्लक्ष केलेले आहे. त्या मुळे 22 सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर संघटना मा.मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय अमरावती येथे आमरण अन्नत्याग आंदोलन करण्याच्या तयारीत आहे संघटनेच्या

प्रमुख मागण्या मध्ये वन शहीद स्मारक उपवनसंरक्षक कार्यालय च्या आवारात स्थापन करणे., गोपनीय अहवाल ( सी आर) कर्मचारी यांना देणे., सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत कर्मचारी यांना अद्यावत करून देणे.आश्वासित प्रगती कर्मचारी यांना तात्काळ लाभ देणे.पावसाळ्याच्या दिवसात वन कर्मचारी यांना रेनकोट, शुज देणे.पिक नुकसानी बाबतीत उपयोजना करणे.

     कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या तात्काळ करणे.श्री. अभिजित ठाकरे साहेब यांची बदली बुलढाणा जिल्हा बाहेर तात्काळ करणे.किरकोळ चुका बाबतीत कर्मचारी यांच्या भविष्यात परिणाम न होता तात्पुरत्या स्वरूपात वार्षिक वेतन वाढ रोखण्यात आल्या आहे.अशा कर्मचारी यांना ताकीद देवून अशा कर्मचारी यांना वार्षिक वेतनवाढ देणे.

करिता वरिल कर्मचारी च्या मागण्या बाबतीत तात्काळ दखल घेवून मार्गी लावण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना,चे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे व सचिव कैलास सलामे यांनी केली आहे, निवेदनाच्या प्रतिलिपी-मा.मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती मा.जिल्हाधिकारी साहेब अमरावती मा‌.पोलीस अधिक्षक अमरावती मा. जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती,मा.आयक्त महानगरपालिका अमरावती

मा.वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, विभागीय वनअधिकारी सामाजिक वनिकरण बुलढाणा मा.पोलीस निरीक्षक, गाडगे नगर पोलीस स्टेशन अमरावती मा. प्रदेश अध्यक्ष वनरक्षक- वनपाल संघटना महाराष्ट्र राज्य नागपूर

मा.सर्कल अध्यक्ष/सचिव वनरक्षक- वनपाल संघटना अमरावती. यांना पाठविण्यात आल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये