जिल्हास्तरीय सब ज्युनिअर U-17 व मिनी सब ज्युनिअर U-14 ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणी 2025

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सब ज्युनिअर U-17 व मिनी सब ज्युनिअर U-14 ( मुले व मुली ) खेळाडूंना कळविण्यात येते कि, 17 वी सब ज्युनिअर (U-17) व 13 वी मिनी सब ज्युनिअर ( U-14 ) मुले व मुली टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 09 ते 11 जून 2025 दरम्यान साकोली, जिल्हा भंडारा येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाचा संघ सहभाग करण्याकरिता दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची निवड चाचणी दिनांक 25 मे 2025 रोजी ठीक सकाळी 11:00 वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात येत आहे.
दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना सोबत येताना आधार कार्डची 03 प्रत झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या मुले व मुली खेळाडूंचे दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल व निवड झालेला संघ साकोली, भंडारा जिल्हा येथे दिनांक 09 ते 11 जून 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार.
तरी इच्छूक खेळाडूंनी हर्षल क्षिरसागर (706691570), सुरज परसूटकर (8669075173), बंडू डोहे (7066666105), ईश्वर पोर्थला (7755908124), चंदन परसूटकर (9970770132), इखलाख पठान (9834307243), रिंकेश ठाकरे ( 8007172073), मयुर बोनमपल्लीवार (8421726919), भास्कर मुळे (7249232813), अहमद शेख (8007029426), रुचिता आंबेकर (8552925066) श्रुती घटे (9403908274), भाग्यश्री मेश्राम (9156076952 ) निखिता ढोरके (8551062243) यांच्याशी संपर्क साधावा.
निवड चाचणीचे नियम
01) U-14 वर्षांसाठी 30 / 09 / 2011 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.
02) U-17 वर्षांसाठी 30 / 11 / 2008 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.