ताज्या घडामोडी

डी बी पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा – सहा जुगाऱ्यांना अटक

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

अखेरीस राजुरा पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केले असुन बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर डी बी पथकाने धाड घालुन तीन हजारांच्या मुद्देमालासह सहा आरोपींना अटक करण्यात आली. मात्र ह्या कारवाईत जुगार खेळणारे बडे धेंड पळुन जाण्यात यशस्वी ठरले. पसार होणारे जुगारी लगतच्या तेलंगणा राज्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील असुन ह्या ठिकाणी लाखोंचा जुगार खेळल्या जात असल्याची चर्चा आहे.

प्राप्त माहिीनुसार नुसार शहराच्या सीमेलगत माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार ह्यांचे मालकीचे शेत आहे. शेताजवळून मोठा नाला वाहतो. हा परिसर उन्हाळ्यात बरेचदा निर्मनुष्य असल्याने जुगाऱ्यांनी इथे आपले बस्तान बसविले. याठिकाणी शेजारील तेलंगणा राज्यातील तसेच लगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसरातील शौकीन जुगार खेळण्यासाठी येत होते व रोज लाखोंचा जुगार सुरू होता अशी शहरात चर्चा होती.

डी. बी. पथकाला माहिती मिळताच पथकाचे प्रमुख धर्मेश जोशी ह्यांनी सहकाऱ्यांसह जुगार अड्ड्यावर धाड घातली. धाड पडताच पळापळ सुरू झाली व काही जुगारी पळायला लागले. त्याच परिसरात काही अंतरावर जुगाऱ्यांची दुसरी टोळी जुगार खेळत होती मात्र पोलिसांची धाड पडल्याचे लक्षात येताच ती टोळी पसार झाली. दरम्यान ह्या धाडीत 1) अब्दुल मुखत्यार अब्दुल गफार वय 45 रहा. भारत चौक राजुरा, 2) प्रवीण विठ्ठल वाटेकर वय वय 35, 3) सीताराम देवाजी ठाकूर वय 35, 4) मल्लेश नागांना यामुलवार वय 55, 5) शमशोद्दिनन इम्मामोद्दिन सय्यद, 6) शाहिद नसीम अहमद वय 30 रहा. इदिरा नगर राजुरा ह्या सहा आरोपींना तीन हजारांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. सर्व आरोपींवर जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये