ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयात 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

मराठी राजभाषा दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 अष्टविनायक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय येथे वर्ग 10वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमांची सुरुवात दिप प्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले शारदा माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार, प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुदर्शन मोहुर्ले, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष भक्तदास डहलकर, सदस्य मीनाक्षी फुलझेले,मनीषा धुडसे,प्रमोद कोलते शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पत्रू नवघडे, सहा. शिक्षक प्रदीप दोडके, गोविंदा बुरांडे,विनोद बोरकर,निखिल बुगावार उपस्थित होते. याप्रसंगी सुदर्शन मोहुर्ले यांनी मराठी भाषा दिनाची माहिती व विद्यार्थी जीवनात शिक्षणाचे महत्व कसे आहे हे अनेक उदाहरणं सांगून स्पष्ट केले.

तसेच वर्ग 9वी, नयन निकेसर, अनुष्का धाईत तर 10वी तील सुफियान कुरेशी यांनी शिक्षकावर कवितेच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या तर धनश्री समर्थ, आचल समर्थ, दिपक नवघडे, राज धुळसे, अंजली शिवणकर,विद्यार्थ्यांनी भावुक होत मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्वच मान्य वराणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी नी कुमकुम गंडाटे तर आभार अनुष्का धाईत हिने मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये